'ठरलं तर मग' आजचा भाग २ एप्रिल २०२४ Tharal tar mag today's episode reviews.

 'ठरलं तर मग' आजचा भाग २ एप्रिल २०२४ Tharal tar mag today's episode reviews 


ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुभेदारांच्या घरची धुळवड अगदी उत्साहात साजरी होत असते प्रत्येक जण एकमेकांना रंग लावत असतात मग काही वेळानंतर तेथे पुर्णाआजी येतात तेव्हा अस्मिता पळत  जाते आणि आजी असं म्हणून पुर्णाआजीला  रंग लावते त्या खूपच खुश होतात आणि सायलीकडे पाहतात तर ती एकटीच उभी असल्यामुळे त्या विचारतात ही का अशी उभी आहे ग त्यावेळी अस्मिता म्हणते अर्जुनची वाट पाहत असेल बाकी काय असं म्हणून ती लगेच नाक मुरडते मग काही वेळानंतर तेथे प्रताप येतो आणि म्हणतो पुर्णाआजी मी तुला रंग लावणार असं म्हणून तो देखील आता पुर्णाआजी रंग लावतो तेवढ्यातच कल्पना विमल त्याचबरोबर सायली देखील तेथे येतात सायली पुर्णाआजी रंग लावून म्हणते हॅपी होळी पुर्णाआजी असं म्हणून ती आशीर्वाद देखील घेते तेव्हा त्या देखील सायली ला आशीर्वाद देतात पुढे पुर्णाआजी विचारतात अरे अश्विन आहे कुठे? तेवढ्यातच अश्विन आत येथे येतो आणि पूपुर्णाआजी विचारतात की अरे तू कुठे गेला होतास एवढा वेळ तो म्हणतो मी दादाला बोलवायला गेलो होतो पण तो आलाच नाही तेव्हा प्रताप म्हणतो जर अर्जुना रंग खेळायला आवडत नसेल तर सोडून द्या ना तुम्ही काय त्याला फोर्स करताय.कल्पना म्हणते मला वाटलं होतं सायली आली म्हटल्यावर अर्जुन देखील येईल पण तो आलाच नाही . सायली मनातल्या मनात आता  विचार करू लागते मी त्यांच्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाही कारण ते माझ्यासाठी रंग खेळायला का खाली येतील.  

पुर्णाआजी देखील म्हणतात हो तो येणारच नाही मला असं वाटतंय असं कसं येणार नाही त्याला तरी यावच लागेल रंग खेळायला आता तेंव्हा प्रिया त्या ठिकाणी येते अस्मिता लगेच तिच्याकडे धावत जाते आणि तिला रंग लावणार असते पण आता मुद्दामच नाटक करत प्रिया म्हणते नाही हा अस्मिता अर्जुन आल्याशिवाय मी अजिबात धूळवड खेळणार नाही आणि अर्जुनला येऊ देत ना मी पहिला रंग त्याच्याकडूनच लावून घेणार आहे असं सायलीकडे पाहत मोठ्या तोऱ्यातच प्रिया म्हणते त्यामुळे सायलीला खूप राग येतो. 

 इकडे अर्जुन आता मनातल्या मनात विचार करू लागतो मेसेस सायली अजूनही आल्या नाहीत त्यांना खरंतर ही धुळवड खेळायला खूप आवडते पण मला आवडत नाही पण मिसेस सायलींसाठी मी जाऊ शकतो ना तिकडे असं म्हणून तो लगेच आवरायला घेतो तो म्हणतो मिसेस सायली मी आलोच तुम्ही तयार राहा दुसरीकडे प्रिया म्हणते मी जाते आणि अर्जुन ला बोलवणार तेंव्हां अस्मिता म्हणते अग खरच तो येणार नाही मग प्रिया अती शहानपणा करत म्हणते की तो येणारच आहे. बघ ते मी ट्राय करून मग असं अश्विन कडे रागातच ती पाहून म्हणते तेव्हा अश्विन म्हणतो हो तर ट्राय कर मग प्रिया आता लगेच आत मध्ये जाते तेंव्हा सायलीला खूप राग येतो ती मनातल्या मनात विचार करते अर्जुन सरांना धुळवड खेळायला घेऊन येणारी ही कोण? आहे ही एवढा हक्क का गाजवती या गोष्टीचा त्रास आता सायलीला होत असतो ती प्रियाकडे खूप रागात पाहते मग प्रियाता आत मध्ये जाते तिथे गेल्यानंतर ती थोडी थांबते आणि मनातल्या मनातच विचार करू लागते की अर्जुन तर मला समोर उभे सुद्धा करणार नाही मी मोठे तोऱ्याने  तर म्हणून गेले सर्वांना मी अर्जुनला घेऊन येईल मग या गोष्टीचं तिला खूप टेन्शन आलेलं असतं तर सायली खिडकीतून अर्जुनकडे पाहत असते की अर्जुन खरच येतो की नाही अर्जुन रूममधून बाहेर येताना सायलीला दिसतो तेव्हा सायली आता गालातल्या गालात हसते आणि त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते मग नंतर प्रियाचं देखील अर्जुन कडे लक्ष जातं ती आता खूप खुश होत मनातल्या मनात विचार करते अरे बापरे लॉटरी तर लागली आता मीच सर्व क्रेडिट घेणार असं म्हणून ती धावत धावत अर्जुन कडे जाते आणि लगेच त्याचा हात पकडते आता सायलीला खूप राग येतो तर अर्जुनाला  आश्चर्य वाटतं त्याला ओढत ओढतच बाहेर घेऊन जाऊ लागते.अर्जुन तिला म्हणत असतो की माझा हात सोड पण प्रिया ऐकायला तयारच नसते. 

अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो सायलीला आता  प्रचंड राग आलेला असतो मग नंतर अस्मिता म्हणते अरे पाहिलं का जे कुणाला जमलं नाही ते तन्वीने   करून दाखवलं अर्जुनला शेवटी ती धुळवड खेळायला घेऊन आलीच असं म्हणून ती प्रियाची स्तुती करू लागते तेव्हा कल्पना अश्विन रागातच प्रियाकडे पाहू लागतात.पुर्णाआजी आता प्रियाला म्हणतात की असंच सर्वांना एकत्र आणायचं असतं तन्वी बाळा शाब्बास असं म्हणून कौतुकाने त्या तिच्याकडे पाहू लागतात सर्वांना दाखवण्यासाठी म्हणून प्रिया लगेच रंग हातात घेते.  त्यावेळी अश्विन म्हणतो आता खूप भाव खाल्ला हा दादा मीच तुला पहिला रंग लावणार प्रियाता लगेच म्हणते की अजिबात नाही कारण अर्जुन ला पहिला रंग लावणार तर तो मीच इकडे सायली आणि कल्पनाला प्रियाचा हे बोलणं ऐकून खूप राग येतो अर्जुन म्हणतो अजिबात रंग लावायचा नाहीये तरी पण  प्रिया ऐकायला तयारच नसते ,अर्जुन म्हणतो मी इथे फक्त माझ्या बायकोसाठी आलोय आणि तिच्याकडूनच रंग लावून घेणार त्यावेळी कल्पना आणि सायलीलाता खूपच आनंद होतो उद्धटपणे प्रिया म्हणते अरे बायको लावील रे रंग पण तू आता जर बाहेर आलाच नसता तर तिने कोणाला लावला असता मग तो रंग. मी तुला इथे घेऊन आले ना मग हा हक्क फक्त माझाच आहे लगेच अर्जुनाला  रंग लावत असते तेवढ्यातच सायली येते आणि तिच्या हात रागात बाजूला घेते तिला ढकलून देते प्रिया रंगात जाऊन पडते व तिचे तोंड लाल होते तिच्या तोंडाला रंग लागलेला असतो कारण सायलीने एवढे जोरात तिला ढकललेलं असतं की ती तोंडच रंगाने पूर्णपणे भरून जातं तेव्हा घरातील सर्वजण आता आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात.  आता रागात असलेली सायली प्रियाला चांगलीच धमकावते की  माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं तू जा ना त्यांच्यावर कधी हक्क होता ना कधी असेल आणि त्यांना तुझ्याकडून रंग लावून घ्यायचा नाहीये तुला दिसत नाहीये का अजून तू किती पुढे करणार आहेस ग तुला काय वाटतं की यांच्याशी जवळीक साधली तर आमचं नातं तुटेल का? अगं हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे माझ्या संसारावर अजिबात तू डोळा ठेऊ नको प्रिया आधीच तुला मी आधीच सांगते . सायलीचा हा रुद्र अवतार पाहून अर्जुनसह अश्विन त्याचबरोबर घरातील सर्वजण अवाक होतात पुढे आता सायलीही तिला चांगली ताकीद  देते की मी  सहनशील आहे परंतु अजिबात दुबळी नाही त्यामुळे माझ्या नवऱ्याच्या इथून पुढे जर जवळ येण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे . तेंव्हा प्रिया सायलीकडे पाहतच राहतो आणि मनातल्या मनात विचार करतो त्यावेळी पुर्णाआजी उठतात आणि म्हणतात ए मुली तू कुणाशी बोलते याचा भान आहे का तुला ती तन्वी आहे तन्वी.  अर्जुन आता लगेच पुढे जातो पुर्णाआजी काहीतरी बोलणार असतो तेव्हा सायली म्हणते हे पहा पुर्णाआजी मला कुणाचाही अनादर करायचा नाही परंतु माझी पण सहनशीलता आहे की नाही प्रिया नेहमी असंच करते की माझ्या नवऱ्याच्या पुढे पुढे करते माझ्याही सहनशीलतेचा अंत ती सारखी पाहत असते मलाही काही वाटत नसेल का पुढे पुढे करून त्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते.  जबरदस्तीने ती त्यांना रंग लावायला जात होती आणि सारखी खेचत होती तर मी मुळात का सहन करू असं ती पुर्णाआजी ला विचारते बायको म्हणून अशा परिस्थितीत माझे कर्तव्य नाहीये का? आता पुर्णाआजी तुम्हालाही हे मान्य असेल यांच्यावर जर कोणाचा हक्क असेल तर बायको म्हणून फक्त माझा आणि माझाच आहे.  वातावरण अगदी गंभीर झालेला असताना अश्विन म्हणतो अरे तुम्ही रंग खेळा तुम्ही का पाहताय तेंव्हा परत एकदा सगळीकडे रंगांची उधळण  होते एकमेकांना रंग लावू लागतात म्युझिक सुरु करतात आणि त्यावर धमाल मस्ती सुरु होते . आता सायली अर्जुनचा हात पकडते आणि त्याला पुढे घेऊन जाते आणि अगदी प्रेमानेस त्याच्या गालावर रंग लावते तेव्हा अर्जुन देखील आता तिच्याकडे खूप वेळ पाहू लागतो दोघेही एकमेकांच्या प्रेमाच्या रंगात रंगून जातात गेलेले असतात मग अर्जुन देखील आता रंग घेतो आणि सायलीला लावणार असतो तेवढ्यातच एका माणसाचा धक्का अर्जुनला लागतो तेव्हा अर्जुनचा आता रंग सायलीच्या गालाला लागतो दोघेही एकमेकांकडे पुन्हा एकदा पाहू लागतात. 

त्यानंतर अर्जुन आणि सायली पुन्हा सर्वांसमोर येतात होळीच्या गाण्यावर डान्स करू लागतात घरातील सर्वांना खूप आनंद झालेला असतो तर प्रियाचा आता खूप जळफळाट होत असतो ती रागाने दोघांकडे पाहू लागते मग अस्मिता देखील नाक मुरडत असते.सायली अर्जुनसाठी सर्वजण टाळ्या वाजवतात गाणं संपल्यानंतर अर्जुन सायली एकमेकांकडे पाहत असतात घरातील सर्वजण आता त्या दोघांच्या जवळ येतात तर ही त्या दोघांचं लक्ष नसतं कारण दोघेही एकमेकांकडे खूप वेळ एकटक पाहत असतात त्यावेळी अश्विन म्हणतो अरे दादा गाणं संपलं त्या दोघांचं लक्ष नसतं.पुर्णा आजी दोघांना बोलते होळी खेळून झाली का ?गाणं संपला आहे अरे तेव्हा अर्जुन सायली एकमेकांपासून दूर होतात सर्वजण त्यांच्यावर हसतात कल्पना कौतुकाने दोघांकडे पाहत असते.

ईकडे अर्जुन रूममध्ये येतात आल्याबरोबरच अर्जुन लगेच तिला म्हणतो मी तुमच्यासाठी गरमागरम चहा बनवलाय तुमचा आवडता आल्याचा आणि मसाला टाकून तेव्हा सायली आता कप  हातात घेते आणि अर्जुन कडे पाहतच राहते मग पुन्हा तीच अर्जुनला  विचारते की तुम्ही असे माझ्याकडे का पाहताय अर्जुन म्हणतो म्हणजे काय असं म्हणून ती नजर चोरते,अर्जुन म्हणतो अहो होतं कधी कधी असं मग असं म्हणून ती पुन्हा पुढे जाते अर्जून तिच्या पाठीमागे जातो आणि तिला म्हणतो  त्या प्रियाला अजिबात आपल्या आसपास देखील फिरू द्यायचं नाही पण तुम्ही थोडसं बोलता तन्वीला असं तुम्ही रंगात नाही तर जमिनीवर आपटायला पाहिजे होतं तिचं तोंड म्हणजे समजलं असतं.पुर्णा आजीला  त्यावेळी उत्तर दिलं ना ते पाहून तर मी अवाकत झालो कारण त्यांना रागही आला नाही आणि प्रिया काय करते तेही समजलं आता मनातल्या मनात सायली विचार करते खरंच प्रियाच्या हाताला मी एवढा जोरात हिसका दिला का? खरं तर हे माझ्या स्वभावात नाही आणि कधी नव्हे मला प्रियाच्या वागण्याचा इतका त्रास का झाला कळतच नाही नेमकं काय होतंय असं ती स्वतःलाच प्रश्न विचारू लागते.आता पुढील भागामध्ये सायली सर्वाना जेवण वाढत असते ती पण डाव्या हातानेच कल्पना म्हणते काय ग सायली तुझ्या उजव्या हाताला काय झाले तेव्हा सायली अर्जुनकडे पाहतच राहते. 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

'ठरलं तर मग' आजचा भाग १ एप्रिल Tharal Tar Mag Today's Episode Review

औरंगाबाद घूमने की १० प्रमुख जगह ( Top 10 Tourist Attractions of Aaurangabad )

तमिलनाडु घूमने के प्रमुख दस पर्यटन स्थल ( Top 10 Tourist Attractions in Tamil Nadu)